काँग्रेस नेते राहुल गांधी वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात राहुल गांधींना सावरकरांविषयी संभाळून बोलावं मालेगाव सभेमध्ये असे उद्धव ठाकरे यांनी खडसावलं होतं तर दिल्लीत शरद पवारांनी देखील राहुल गांधींचे कान टोचले आहेत सावरकरांविषयी राहुल गांधी वाद ओढून घेताय का? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून विचारला जात आहे
काँगेस पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी राहुल गांधी यांची देशभरात भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींनी पायी दौरा केला पण त्या यात्रेत काँगेस नेत्यांनी कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःच्या मुलांना पुढे आणले त्यावरूनच राज्यातील अनेक काँगेसचे पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जात आहे नेत्यांच्या मुलांना प्रमोट केल्याने असं सिद्ध झालं कि काँगेस आजही घराणेशाही पोसवत आहे का?
महाराष्ट्रात काँगेस मध्ये मोठ्या प्रमाणत गटबाजी
विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वाद उफाळून आले होता.त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यस्थी घेत त्या वादाला मिटविलं होतं. मात्र आता काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं प्रभुत्व असलेल्या गोंदिया जिल्ह्यातच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून गोंदिया जिल्हा काँग्रेस बचाव समिती स्थापन करून पक्षात बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, याकरता आजपासून अनिश्चित कालीन धरणे सुरू करण्यात आलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात वारंवार नाना पटोलेंकडून ढवळाढवळ होत असल्याचा आरोप देखील आशिष देशमुख यांनी केला होता तसेच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी केली तर त्यांची काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आली.
विजय वड्डेट्टीवार, सुनील केदार तसेच यशोमती ठाकूर यांनी उघड नाराजी व्यक्त करत नाना पटोले विरोधात पक्षश्रेष्ठींना सविस्तर पत्र लिहिले होते नाना पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती तरीही पटोलेंवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने राज्यातील काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींवर आणि काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींवर नाराज असल्याची चर्चा आहे.
गोंदियामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक करताना काँग्रेस पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी यांच्या निर्णयाचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ साधून जिल्हा उपाध्यक्ष गप्पु गुप्ता यांनी राजकुमार पटले यांना उपसभापती पदावर विराजमान केलं असल्याचा आरोप गोंदिया जिल्हा काँग्रेस बचाव समितीनं प्रदेश कमिटीला दिलेल्या एका निवेदनात केला आहे.
आता राज्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गोरेगाव येथे काँग्रेसच्या एका गटानं बंड पुकारला होता तर त्याला जिल्हाध्यक्षांनी दुजोरा दिल्याचा आरोप करत आता काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष, 02 तालुकाध्यक्ष, 10 विविध सेलचे अध्यक्ष, याशिवाय महिला अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रदेश कार्यकारिणीकडे बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली असून जर मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका आता पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील आपसी मतभेद चांगलेच उफाळून आले असल्याचं दिसून येत आहे.
कॉंग्रेस पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना मोठा धक्का बसला आणि याप्रमाणे पक्षाची कोंडी करण्यात आली असल्याचा देखील आरोप या निवेदनात केला आहे. तसेच बंडखोरी करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी याकरिता गोंदिया जिल्हा काँग्रेस बचाव समितीच्या वतीनं अनिश्चित कालीन उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावरून राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आल्याचं दिसत आहे.
