राष्ट्रवादीत राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत – विजय शिवतारे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री पदाची स्पर्धा लागली की काय हा प्रश्न सामान्य लोकांत निर्माण होत आहे कुठलाही कार्यकर्ता उठतो आणि भावी मुख्यमंत्रीपदाचा बॅनर लावतो आणि मनाला समाधानी करून घेतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा खरंच पूर्ण होणार का? असाही प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे असे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लागत असेल तर त्यांच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदासाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गटबाजी ही दिसत आहे अजित पवारच्या गटाचा कार्यकर्ता तर कुणी सुप्रिया सुळे गटाचा कार्यकर्ता तर कुणी जयंत पाटील गटाचा मग हे गट पुढील काळात वेगळा रस्ता धरणार का? हाही प्रश्न जनसामान्यांना पडला आहे ह्या सर्व बाबी लक्षात घेता त्यातच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनाम्याच्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.

काय म्हणाले झिरवाळ आणि शिवतारे

नरहरी झिरवळ यांनी अजित पवार यांचा गौरवोद्गार काढत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगितले राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटते तेही झिरवळे यांनी बोलून दाखवले. यावेळी ते म्हणाले दादा लोक म्हणतात दादा गरम आहे दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात त्यामुळे त्यांना भेटायचे म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो कामाच्या बाबतीत अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त त्यामुळे कोणतेही काम करताना अजित पवार यांच्याही पेक्षा अधिक स्ट्रिक्ट झाले पाहिजे असे मत झिरवळांनी व्यक्त केले

विजय शिवतारे पुढे म्हणाले, अजित पवार हे थोतांड माणूस नाही. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि पुन्हा परत आले यावर माझा विश्वास नाही. कारण तिकडे जे चालू होते ते ठीक नव्हते म्हणून ते तिकडे गेले. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे तर शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेत यावं असं आमंत्रण विजय शिवतारे यांनी दिले.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजी सुरु असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. तर अजित पवार यांना आपण मुख्यमंत्री करुनच राहू, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे चंगच बांधल्याचे झिरवळ यांच्या वक्तव्यावरून दिसले. अशातच आता माजी मंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत मोठ विधान केले आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे असे राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून वाटत असताना अजित पवार हे राष्ट्रवादीत राहून कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचे विजय शिवतरे यांनी म्हटले आहे. तर अजित पवार हे कर्तबगार नेते आहेत मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले तर ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाची विजय शिवतरे यांनी केल्याचे आज पाहायला मिळाले.