भाजपची 2024 ची मोर्चेबांधणी सुरू; पुणे जिल्यात निवडणूक प्रमुखांची नेमणूक

राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करताना दिसत आहे देशात भाजप एकमेव असा पक्ष आहे कि आपल्या विकास कामांना प्राधान्य देऊन निवडणुकीला सामोरं जात असतात आपल्या जाहीरनाम्यानुसार लोकसभा मतदारसंघात लोकांना आश्वासन दिलेली विकास कामे पूर्ण करण्याचा मानस खासदारांचा असतो ती जबाबदारी खासदारांनी किव्हा आमदारांनी विकास पूर्ण केली का? याचाही आढावा भाजप पक्षाकडून घेतला जात असतो राज्यातील लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे. हे तिघेही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मानले जातात. मात्र निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उमेदवारी त्यांनाच मिळणार का? असा प्रश्नही भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

दिवंगत भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली परंतु भाजपने मिशन 2024 मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजप कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना भाजपने संपूर्ण पुणे जिल्ह्याची तयारी सुरु केली आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. या लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे आली आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी अन् हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदार संघात येतो. २००९ पासून या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने ही जागा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे या ठिकाणी खासदार झाले.

पुणे लोकसभा मतदार संघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे छावणी अन् कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ येतो. २०१४ पासून या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. गिरीश बापट २०१९ मध्ये या ठिकाणी खासदार झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सध्या ही जागा रिक्त आहे. आता या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे त्यांचे वारसदार ठरणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.