शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्र रेल्वे प्रवास

राज्यात मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापलं आहे. रोज नवनवीन राजकीय घडामोडी, आरोप-प्रत्यारोपांनी युती आणि आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं लपून राहिलेलं नाही. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याच्याही शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचवेळी आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी अपडेट समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील या दोन्ही नेत्यांनी रेल्वेच्या एकाच डब्यातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार व मंत्री पाटील या दोघांमध्ये राजकीय विषयांसह जळगाव जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहेत. मात्र, दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सध्या महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. अशातच आजे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एकत्र रेल्वेतून प्रवास केला.या दोघांच्या एकत्रित प्रवासाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोन नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या कार्यक्रमासाठी गुरुवारी शरद पवार हे मुंबई येथून रेल्वेत बसले. या दरम्यान शरद पवार ज्या डब्यात होते, त्या डब्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा दिसून आले. गुलाबराव पाटील व शरद पवार एकाच डब्यातून प्रवास करताना पाहून आनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांचा संदर्भात चर्चा झाल्याचे समजत असून दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, त्यांच्यामध्ये नेमकी राजकीय चर्चा काय झाली हे समजू शकले नाही.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर टीका करत आहेत.शिवसेना ही राष्ट्रवीदी काँग्रेस पक्षासोबत गेल्यानेच अनेक जण उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडल्याचं शिंदे गटातील आमदारांनी भाषणांमधून ठिकठिकाणी जाहीरपणे सांगितलं आहे.
ज्या पक्षावर सातत्याने टीका करतात, त्याच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.