काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी घेतली गडकरींच्या भेट

काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख हे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या निवासस्थानी थोड्या वेळापूर्वी भेट घेतली आहेत.आशिष देशमुख यांचा घरवापसीचा मुहूर्त ठरला आहे उद्या नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली होती. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपाची दखल काँग्रेस पक्षाने घेतली. देशमुख यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. काँग्रेसमधून निलंबित करण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.

तर या भेटीगाठीनंतर आशिष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान ते भाजपकडून सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती देखील समोर येत आहे.आशिष देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले गडकरी मला वडिलांसारखे आहे त्यांच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा विधानसभेत जाईल असेही देशमुख म्हणाले