मुंबईतील शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे. ही माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थीनीच्या कुटुंबियांची दादार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जाऊन भेट घेतील. तसेच यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत योग्य न्याय मिळवून देण्याचे देखील आश्वासन दिले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिकांचे निलंबन करण्यात येत आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, “घडलेल्या या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घेतली. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार, वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे. याबरोबरच मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली”, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान, याबरोबरच कुटुंबीयांतील त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. या घटनेनंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अर्गत येणाऱ्या सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेण्यात येणार असून महिला सुरक्षा रक्षकही देण्यात येईल.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील शासकीय वसतिगृतील विद्यार्थीनीवर वसितीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:देखील रेल्वेखाली जाऊन आपला जीव दिला. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांना वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावर या तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यास निदर्शनास आलं होतं. तेव्हा पोलिसांनी त्या सुरक्षा रक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु काहीच वेळात त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या सुरक्षा रक्षकाने जवळील चर्नी रोड स्थानकावर जाऊन ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ तपास करण्यास देखील सुरुवात केली.
