उकाड्यापासून दिलासा मिळणार; उद्यापासून राज्यात पावसाचा अंदाज

निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र आता यादरम्यान हवामान विभागाने पावसाच्या आगमनाबाबत दिलासादारयक माहिती दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पाऊस कोसळणार आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात देखील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दक्षिण कोकणामध्ये खरीप हंगामाची पेरणी पावसाळ्यापूर्वी होते. जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये रब्बी हंगामाच्या पीक काढणीनंतर खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी केली जातात. त्यामुळे मेच्या अखेरीस बहुतांश भागात पेरणी झाली. तथापि उत्तर कोकणामध्ये पावसाची प्रतीक्षा ताणली गेली, तरीही काही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मेच्या अखेरीस अर्थात ३० मेपासून भात पेरणीला सुरुवात झाली.

मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.मान्सून दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो, मात्र यंदा तो 7 जूनला दाखल झाला. रविवारी, 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यानंतर पुढच्या 4, 5 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात मान्सून सुरू होऊन चार दिवस झाले असले तरी अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजासह लोकांची चिंता वाढली आहे.