राजधानी पाटणा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (23 जून) विरोधी पक्षांची बैठक झाली. सीएम नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची बैठक पाटण्यात झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रणनीती कशी तयार करायची आणि कस लढायच हे सर्वांचे ध्येय एकच आहे. एकीकडे नितीश कुमार आपल्या मिशनमध्ये मग्न आहेत, तर दुसरीकडे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत जोरदार हल्लाबोल केला आहे. पीकेचे म्हणणे खरे ठरले तर मुख्यमंत्री नितीश यांचे मिशन बिघडू शकते.
प्रशांत किशोर म्हणाले की आता नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर आणि बाणाच्या बटणावर कोणीही निवडणूक जिंकणार नाही जेडीयू हा पक्ष टिकणार नाही. एकही मत त्यांना मिळवता येणार नाही हे खुद्द नितीश कुमार यांनी मान्य केले आहे आज जेडीयूच्या झेंड्याखाली राजकारण करणाऱ्या लोकांना समजते की जेडीयूची बोट हळूहळू बुडत आहे.
जशा-जशा निवडणुका जवळ येतील, तशा-तशा पक्ष टिकवणे कठीण होईल
नितीश कुमार यांच्या पक्षावर हल्लाबोल करताना प्रशांत किशोर म्हणाले की जेडीयूला आज कोणतेही भविष्य नाही. नितीश कुमार यांच्या पक्षात जे लोक काम करायचे त्यांनाही माहिती झालं जेडीयूच काही खरं नाही म्हणून, जेडीयूमध्ये काम करणाऱ्या मोठ्या संख्येने लोकांना कळले आहे. निवडणुका जवळ आल्या की जेडीयू नावाचा पक्ष टिकून राहणे आणि त्या पक्षाच्या नावावर मतदान मिळणे फार कठीण दिसते.
प्रशांत किशोर म्हणाले-बिहार हे नितीश कुमारांचे जहागिरी नाही
पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की नितीश कुमार मुख्यमंत्री होतात किंवा पंतप्रधानांचा चेहरा बनतात, हे सत्य आहे की बिहार हा नितीश कुमारांची जागीरी नाही. बिहारच्या जनतेला सांगावं नितीश कुमारांनी समाजासाठी काही काम केले आहे का?
