मोदी@9 पुस्तिकेचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते प्रकाशन

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या 9 वर्षांचा प्रवास अविस्मरणीय बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठ्या मोहिमेची आखणी केली आहे. यामध्ये केंद्र सरकारचे काम आणि 9 वर्षातील कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. याची सुरुवात 31 मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतुन झाली यासोबतच ‘संपर्क टू सपोर्ट’ हा कार्यक्रमही सुरू करण्यात येणार आहे.31 मे ते 30 जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत पक्षाने देशाच्या विविध भागात सुमारे 51 मोठ्या जाहीर सभा घेण्याची योजना तयार केली आहे. ज्यामध्ये पीएम मोदी जवळपास 8 सभांना संबोधित करणार आहेत.त्यांच्याशिवाय अमित शाह, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी यांच्यासह इतर नेतेही रॅलींना संबोधित करणार आहेत. भाजपच्या सोशल मीडिया टीमनेही व्यापक प्रचाराची आखणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या 60 हजार प्रती पुणे लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ बावनकुळे यांच्या हस्ते आज झाला.

या पुस्तिकेचे पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 10 हजार अशा एकूण 60 हजार पुस्तिकांचे वाटप स्वतः संजय काकडे करणार आहेत. त्या त्या विधानसभा मतदार संघातील 25 ते 30 कार्यकर्ते सोबत घेऊन ही पुस्तिका नागरिकांना देण्यात येणार आहे, असे संजय काकडे यांनी सांगितले.

माजी खासदार संजय काकडे म्हणाले गोरगरीब जनतेसाठी सेवा व वंचितांचा विकास, शेतकरी कल्याणासाठी योजना, महिला व बालकल्याण विकास, मध्यम वर्गासाठी विकासाच्या योजना, आरोग्य सेवा, आर्थिक सशक्तीकरण, व्यापार व उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी ठोस योजना, भारत एक महाशक्ती म्हणून उदयाला येण्यासाठी मोदी सरकारकडून आखण्यात आलेल्या योजनांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.मोदी@9 पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर ही पुस्तिका माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेट देण्यात आली.पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात या पुस्तिकेच्याप्रत्येकी 10 हजार अशा एकूण 60 हजार प्रती वितरित करण्यात येणार आहेत.