दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता. या अपघतात चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा ८ पर्यंत पोहोचला आहे. या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होते. दरम्यान या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तात्काळ देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपघाताविषयी सविस्तर माहिती घेतली.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचं निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले. तसेच, जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. मॅगझीमो रिक्षा (एमएच-०८-५२०८) दापोलीतून आंजर्लेकडे जात होती. तेव्हा आसूद जोशीआळी येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर मॅगझीमो रिक्षा आदळली. ट्रक वेगात असल्यामुळे मॅगझीमो रस्त्याच्या डाव्या बाजूला फरपटत काही अंतरावर गेली. हा अपघात एवढा भयानक होता की, मॅगझीमोचा चक्काचूर झाला. या गाडीतील पाच जण जागीच, तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला.
दापोली-हर्णै मार्गांवरील आसूद जोशीआळीजवळील वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी डमडम व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत डमडम चालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी पाजपंढरीजवळील अडखळ येथील आहेत. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
