गेल्या काही दिवसांपासून राणे पिता-पुत्र आणि खासदार संजय राऊत यांचा वाद मिठण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.काही दिवसाआधी खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून नितेश राणे यांनी जोरदार टीका केली होती भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग होणार नाही ना याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, असे म्हणत खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या जिवाला धोका असल्याचे बोलले जात आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आजच्या दिवशी 3 वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला त्याच्या जाण्यां सर्वांनाच जबर धक्का बसला होता.त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणीतून बाहेर आलेले नाहीत. त्याहीपेक्षी त्याच्या कुटुंबियांना त्याच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. सुशांत हा राजपूत घरातील एकुलता एक मुलगा होता. सुशांतच्या मृत्यूपश्चात त्याचे आई वडील आणि चार बहिणी असा परिवार होता.सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज तीन वर्ष पूर्ण झाली.आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाणला भेटायला गेले.दिशा सालियानच्या हत्येनंतर काही लोक सुशांत सिंगला भेटायला गेले होते.भेट झाल्यानंतर काहीच दिवसात सुशांत सिंगची हत्या झाली.असच काही सूरज चव्हाण बाबत घडणार नाही ना?अशी शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली.त्यामुळे सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग होणार नाही ना याची दखल संबंधित विभागाने घ्यावी असे म्हणत नितेश राणेंनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे की, जे त्यांना आडवे आले त्यांना ठाकरेंनी संपविले आहे, असेही राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊतांवर देखील निशाणा साधला. आजच्या सामनामध्ये राऊतांनी मोदींना हटविण्यासाठी देशातील विरोधी पक्ष वॅग्नोर ग्रुप असल्याचे म्हटले. यावर राणेंनी राऊतांना सुनावले. संजय राऊतांना वॅग्नोर ग्रुपचा इतिहास माहीत तरी आहे काय.थोडी माहिती घेतली असती तर विरोधकांच्या पाटणा बैठकीला वॅग्नोर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती. संजय राऊत घरफोड्या आहे.संजय राऊतला पाटण्यात भेटलेले पण नाझी विचारसरणीचे आहेत असे म्हणायचे आहे का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.तसेच उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला.एका कोपऱ्यात मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेला टाकण्यात आले. मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते आणि अनिल परब आणि लोक शेंबड्या पोरांसारखे मोर्चा काढता आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचले.
