केसीआर यांच्या तेलंगणाला लागून असलेल्या नांदेड जिल्ह्यात दोन जाहीर सभा झाल्या आहेत. या सभांमधून त्यांनी तेलंगणा सरकारचं शेतकऱ्यांसाठीचं मॉडेल उपस्थित जनसमुदायापर्यंत मांडलं आहे. आता संभाजीनगर येथील सभेतूनही हेच मॉडेल अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहवण्याचं काम ते करणार आहेत.पण केसीआर यांचा मराठवाड्यामार्गे महाराष्ट्रात प्रवेशाचा नेमका अर्थ काय आहे? हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी मराठवाड्याच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या पत्रकारांशी आम्ही बातचित केली.
2024 ची विधानसभा आणि लोकसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राज्यात नवीन पर्याय निर्माण होत आहे महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांनी 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशात एक नवा राजकीय पक्ष राज्याच्या राजकारणात पाय रोऊन उभं राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. BRS पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. या पक्षात अनेकांनी प्रवेश केला आहे. तर काहींचा पक्षप्रवेश येत्या काळात होणार आहे. पण BRS पक्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणात विस्तार होतोय. BRS च्या महाराष्ट्र विस्ताराचा राजकीय अर्थ काय? असू शकतो हे पुढील काळच ठरवेल.
काही दिवसाआधी अजित पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना बीआरएसला आणि वंचितला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. यावरूच विरोधक देखील बीआरएसबाबत सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे.
1.दलित बंधू योजनेमुळे दलित मतांवर परिणाम
केसीआर यांनी नांदेडमधून राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. BRS कडून करण्यात येणाऱ्या जाहिराती आणि त्यांच्या भाषणातील मुद्दे पाहता BRS च्या एन्ट्रीने राज्यातील दलित मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता दाट आहे.
2.राज्यातील राजकीय पक्षांना स्पर्धक
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना-ठाकरे गट,मनसे हे असे सहा प्रमुख राजकीय पक्ष आहेत.तसंच इतरही काही प्रादेशिक पक्ष सक्रीय आहेत. अशातच BRS च्या एन्ट्रीने जनतेसाठी एक नव्या पक्षाचा पर्याय समोर असेल अन् राजकीय पक्षांसाठी मात्र आणखी एक स्पर्धक निर्माण झाला आहे
3.काही पक्षातील नाराज नेत्यांना नव संजीवनी मिळू शकेल का?
ज्या लोकांना राजकारणात यायचं आहे.त्यांची आर्थिक कमजोरी असेल ते नेते कार्यकर्ते नव्या संधीच्या शोधात आहेत. अशा लोकांसाठी विशेषत: तरूणांसाठी राजकारणात एन्ट्री करण्यासाठी मोठी संधी असू शकतो.महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता सगळ्याच पक्षात कुणाची ना कुणाची नाराजी पाहायला मिळते. काम करण्याची संधी मिळत नाही, असं म्हणत राज्यात पक्षांतर होत आहेत. अशा या सगळ्याच पक्षातील नाराज नेत्यासाठी ही संधी असेल. त्यामुळे या राजकीय नेत्यांना आपलं राजकीय पुनर्वसन करण्याची मोठी संधी या निमित्ताने मिळणार आहे.
