वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना अटक

ज्येष्ठ आयआरएस अधिकारी आणि ईडीचे माजील कर्मचारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली आहे. छापेमारीनंतर ईडीकडून सचिन सावंत यांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत राजकीय नेते, मोठमोठे अधिकारी ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी केली जात होती. पण आता ईडीचेच माजी कर्मचारीही ईडीच्या रडावर आल्याचं दिसून येत आहे.

सावंत याआधी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाची चौकशी केली होती. सीबीआयने अधिकाऱ्याविरुद्ध नोंदवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला.काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. याप्रकरणाची सचिन सावंत यांनी चौकशी केली होती. त्यात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सचिन सावंत यांच्याविरोधात फिर्याद दिली होती.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेतली आहे. सचिन सावंत यांनी यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. यांनी काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. याप्रकरणाची सचिन सावंत यांनी चौकशी केली होती.सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार आहे.