2024 ला मुख्यमंत्री कोण होणार हे शिंदे-फडणवीस ह्या दोघांनी मिळून ठरवायचे आहे – दीपक केसरकर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2019 साली अजित पवारांबरोबर घेतलेल्या शपथेपासून ते एकनाथ शिंदेंना दिलेलं मुख्यमंत्रीपद आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीतील युतीची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे राज्यात नव्या चर्चेला उधाण आलं आहे.देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत बोलताना पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं नमूद केलं. मात्र 2024 नंतर मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्यानंतर स्पष्ट सांगितले कि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संसदीय बोर्डच घेणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढचा मुख्यमंत्री शिंदे गट नाही तर भाजपच ठरवणार असल्याचं फडणवीस यांच्या विधानातून सूचित होत आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर

मंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.२०२४ ला मुख्यमंत्री कोण होणार शिंदे-फडणवीस ह्या दोघांनी मिळून ठरवायचे आहे. या अगोदर फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं सांगत होते.काही अ‍ॅडजस्टमेंट असू शकते. पहिलं तुम्ही व्हा, मी नंतर होतो असे असू शकते.यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा म्हंटले होते.आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करतो.राज्याला आश्वासक चेहरा लाभलेला आहे,असं दीपक केसरकर म्हणाले आहे.

मुळात शिंदे गटाने दिलेल्या वादग्रस्त ही जाहिरात मुख्यमंत्र्यांना दाखवून दिलेली नव्हती.कार्यकर्त्यांकडून ही जाहिरात दिली होती.ती थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र तोपर्यंत प्रिंटिंगला जाहिरात गेली होती. त्यामुळे त्यात बदल करणे शक्य नव्हते. म्हणून नंतर दुसरी जाहिरात दिली, असं केसरकर यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी आमच्याशी डबल गेम केल्याचं विधान फडणवीस यांनी केलं होतं.त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला त्याला जनतेने स्वीकारले होते. त्यांचा उठाव आणि आमची गद्दारी असं कसं होईल? असा सवाल करतानाच आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून उठाव झाला.महाराष्ट्राच्या इतिहासात हे फक्त दोनदा घडले. पवार त्यानंतर चार वेळा मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढ्या मोठ्या पक्षाची फरपट झाली. मूळ पक्ष बाजूला गेला. एवढी वर्ष नेतृत्व करणारी माणसे बाजूला गेली. याचं आम्हालाही दुःख होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राऊतांना जास्त महत्व देऊ नका औटघटकेच सरकार म्हणारे संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत यांना फारसे सीरियस घेऊ नका, असंही ते म्हणाले.