एकत्र निवडणूक लढविण्याच्या वल्गना मात्र महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकत्रित निवडणूक लढविण्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी जागावाटपाचा तिढा सुटणार का ? हाच मुख्य प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस तिन्ही पक्षांना सन्माजनक जागा हव्या आहेत. त्यामुळे तीनही पक्षांचा एकमेकांच्या जागांवर डोळा आहे. यामुळे आघाडीची वज्रमूठ खिळखिळी होण्याची वेळ आली आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब पक्ष) पक्षाने 2019 सालच्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये 23 जागा लढवल्या होत्या. यापैकी 18 जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागांवर दावा सांगण्यात येतो. संजय राऊत म्हणाले आमचे खासदार आणि आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी मतदार जागेवरच आहे आणि राहील. संजय राऊतांनी केलेली वक्तव्ये आता महाविकास आघाडीतील वितुष्टाचे कारण बनू लागली आहेत.

राऊतांनी सामनातील रोखठोक सदरामध्ये शरद पवारांवर जोरदार टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राऊतांवर नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर विरजण पडले आहे का? सभेमध्ये उद्धव ठाकरेंना मोठी आणि वेगळ्या स्वरूपाची आसन व्यवस्थामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे.मग येत्या काळात महाविकास आघाडी राहणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.संजय राऊतांनी 23 जागांवर दावा केल्यानंतर यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा तात्काळ प्रतिक्रिया दिली. लोकसभेतील जागावाटप हे निवडून येण्याच्या क्षमतेवर म्हणजेच मेरिटनुसार होणार असे त्यांनी म्हंटले. महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिला आहे, असेही पटोले सांगायला विसरले नाहीत.जागावाटपचा निर्णय हा मेरिटनुसार होणार नाना पटोलेंच्या या वक्तव्यामागचा मतितार्थ शोधला तर शिवसेनेतल्या फुटीनंतर सर्व 23 जागांवर शिवसेना ठाकरेंकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत असा आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने 23 जागांवर दावा करू नये,असे पटोलेंना एकप्रकारे सुचवायचे असेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2009 नंतर मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली लोकसभा निवडणुकीत 2009 ला काँग्रेसला तब्बल-17 खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले तर भाजप-9 खासदार तर शिवसेना-11 खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे-8 खासदार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनचे राजू शेट्टी,अपक्ष म्हणून दोन खासदार निवडून आले होते.त्यापाठोपाठ 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे मुळे हिंदू मतांचं विभाजन झाल्यामुळे सेना-भाजप युतीला मोठा फटका बसल्याने काँग्रेसला -82 जागेवर,राष्ट्रवादी काँगेसला -62 जागेवर आमदार विजयी झाले तर विरोधी पक्षात असणाऱ्या शिवसेना -44 तर भाजपला -46 जागांवर विजयी मिळाला, मनसे-13 जागांवर अपक्ष-24 तसेच इतर -17 आमदार विजय झाले

देशात 2014 लोकसभा निवडणुका तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवल्यामुळे एनडीएचे देशात मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणता आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला -23 जागा मिळाल्या तर शिवसेनेला-18 तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त -4 जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षाला 2009 च्या निवडणुकीत 17 जागा मिळाल्या होत्या.त्यांना 2014 ला दोनच जागेवर समाधान मानावे लागले.महाराष्ट्रात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महायुती घडून आणली होती त्या महायुतीचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूका झाल्या सेना-भाजप युतीत पुन्हा एकदा वितुष्ट आलं आणि उद्धव ठाकरेंनी युती तोडून स्वबळाची नारा दिला 2014 च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर 122 जागेवर तर शिवसेनेचे 63 जागेवर आमदार विजयी झाले.राष्ट्रवादी काँग्रेसला-41 तर काँग्रेसचे-42 जागेवर आमदार विजयी झाले इतर-12 तर अपक्ष-7 मनसे-1 विजयी मिळवला आहे.2014 ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपसोबत सत्तेत वाटा देऊन समावून घेतले तरी देखील उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेत असूनही मोर्चे काढण्याचे काम सुरूच ठेवले होते

2019 च्या महायुतीच्या लोकसभा निवडणूका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाल्यामुळे भाजपाला-23 तर शिवसेनेचे -18 खासदार विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला- 4 काँग्रेसला-1 एमआयएम-1 अपक्ष-1 अशा जागा निवडून आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुका देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा पद्धतीने महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 105 आमदार निवडून आले. शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले.विरोधी पक्षात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस 54 तर काँग्रेस 44 तसेच अपक्ष 13 इतर 16 आमदार निवडून विधानसभेत गेले होते.
मात्र उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत हिंदुत्वाला तिलांजली देऊन सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र अडीच वर्षात त्यांनी मातोश्री वर बसून सरकार चालवलं राज्यातील अनेक विकास कामांना स्थगिती दिली. हिंदुत्वापासून उद्धव ठाकरे कोसो दूर गेल्यामुळे स्वपक्षातील नेत्यांना ते पचत नव्हतं. केवळ सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधल्या गेल्याची भावना शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये झाली होती. 2022 ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे अपक्ष आमदारांसहित तब्बल 40 आमदार बाहेर पडले त्या पाठोपाठच 14 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्र आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागलं एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार स्थापन केलं 40 आमदार असणाऱ्या पक्षाचा भाजपने मानसन्मान देऊन मुख्यमंत्रीही केला.

शिवसेना ठाकरे गट- 23 जागांवर दावेदारी –
शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असली तरी 2019 च्या जिंकलेल्या जागा या आम्ही लढवणार असा ठाम सूर ठाकरे गटाचा आहे. तर 2019 साली काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली, यामुळे काँग्रेसने ज्यादा जागांचा मागणी ही रास्त आणि वस्तुस्थितीला धरून नाही, असेही शिवसेनेकडून सांगण्यात आल्याची चर्चा आहे.
माध्यमातील बातम्यांनुसार महाविकास आघाडीत लोकसभेसाठी काँग्रेसने सात-आठ जागा लढावाव्यात असे सुचविण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र मागील दोन लोकसभा निवडणुका वगळता काँग्रेसचा कायम दबदबा राहिला आहे. काँग्रेस देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्यात, लोकसभेच्या जागा मेरिटनुसार लढवाव्यात असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

सर्वाना सन्मानजनक जागा –
महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीतील तिन्हा पक्षांनी समसमान लढवून, प्रत्येकाच्या वाट्याला 16-16-16 अशा जागांवर निवडणूक लढवण्याचा अंतिम प्रस्ताव येऊ शकतो,अशी दाट शक्यता आहे. समसमान जागांमुळे तिन्ही पक्षांचे समाधान होऊन भाजपपुढे तगडे आव्हान निर्माण करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्नशील असेल.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा असतील का ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. मात्र महाविकास आघाडीचा चेहरा हे उद्धव ठाकरेंचं असल्याचे स्पष्ट आहे. याचं प्रत्यय तिन्ही पक्षांची मिळून झालेल्या वज्रमूठ सेभेतून हे दिसून आले. शिवसेनेने जिंकलेल्या जागांवर ठाकरे गट आग्रही आहे. तेवीस जागांची मागणी केल्यानंतर किमान १९ जागा मिळाव्यात, यात कोणतीही तडजोड नाही, अशी भूमिका ठाकरे गटाची असल्याचे सांगण्यात येते.