बोलणं आणि करणं वेगळं यात शरद पवारांचा हातखंडा – चंद्रशेखर बावनकुळे

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शरद पवारांनी आमचा गेम केला. शपथविधी होण्यापूर्वी पवारांशी चर्चा झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार साहेबांच्या जीवनातील अनेक घडामोडी अशा आहेत की सरकार चालवताना किंवा सरकार बदलताना, त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक वेळा बोलणं एक आणि करणे वेगळा,असे अनेक उदाहरणं आहेत, त्यावर वारंवार जाणं योग्य नाही.शरद पवार साहेबांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, ते केव्हाही डबल गेमच करतात, त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी असे झाले आहेत, बोलणे आणि करणे वेगळं यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे त्यांनी असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

जाहिरातीवरुन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी आहे का? या प्रश्नाबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत. जाहिरातीवरून कधीही संबंध खराब न होणारे नेते आहेत. विचाराने मोठे प्रगल्भ आहेत, त्यामुळे जाहिरात कोणी छापली यावर मात्र दोघांमध्ये किंतु-परंतु असं काही होणार नाही त्यांच्यात चांगला संवाद आहेच मात्र सरकारच कामही उत्तम सुरू आहे.

पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्या या शक्ती उध्वस्त केल्या पाहिजे

सोलापूर मध्ये ज्या काही घटना होतात त्याला पाठबळ देणारे नेते आहेत, कधी शरद पवार साहेब, कधी बंटी पाटील बोलतात यांना राजकीय पाठबळ मिळालं नाही तर कोणाची हिंमत नाही, त्यामुळे सर्वच पक्षांनी मानले पाहिजे की भारतात राहून पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्या या शक्ती उध्वस्त केल्या पाहिजे उधळून लावल्या पाहिजे, पण राजकीय पाठिंबा असेल तर त्याला वेळ लागतो पण फडणवीस-शिंदे यांच्या सरकार अशा शक्तींना शोधून काढून त्यांना काढल्याशिवाय राहणार नाही असं बावनकुळे म्हणाले आहेत.