महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करत नव्याने शासन निर्णय जारी केला.सरकारच्या या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं होतं.मात्र उर्वरित राजकीय पक्षांनी या निर्णयाचं समर्थन केलं.या नामांतराविषयी आता पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे.कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी नामांतराला विरोध केल्याचं सांगत मी संभाजीनगर नाही,तर औरंगाबादच म्हणणार,असं वक्तव्य केल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिलं होतं.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना पहाटेच्या शपथविधीसंदर्भात शरद पवारांबाबत अनेक खुलासे केले.शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीतमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहण्यास मिळत आहे.फडणवीसांच्या आरोपांवर काल (दि. 29) पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. हा वाद कुठे शांत होत नाही तोच फडणवीसांनी पवारांनी बसवलेला धुराळा पुन्हा एकदा उडवत जुन्या वादाला नव्याने वाचा फोडली आहे.ते गंगापूर येथे आयोजित मोदी @9 कार्यक्रमात बोलत होते.
सभेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की भाजपनं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं केलं. तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी सभेतील नागरिकांना विचारला.त्यावर उपस्थितांनी होकार दिला.पण पुढे बोलताना म्हणाले हे नामांतर पवार साहेबांना मान्य नसून, तुम्ही नाव काहीही करा मी, औरंगाबादच म्हणेन असे म्हटले होते.परंतु पवार साहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाहीत.छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाहीअसे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
