उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार प्रथमच मंत्रालयात, महापुरूषांच्या प्रतिमांना केले अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील तसेच आदिती तटकरे यांनीही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले.मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.