अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची अडचण झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांवर टीका करूनच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते.आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत.यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.भरत गोगावले म्हणाले की,शिंदे-फडणवीस यांचं ऑपरेशन सुरू होत, म्हणून आम्हाला थांबवल होत आता ऑपरेशन सक्सेस झालं आहे.त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल.अजित पवार गेल्यावेळीसारखं करणार नाहीत.मुख्यमंत्री आणि देवेंद्र काळजी घेतील.अजित पवार यांना आम्हाला न्याय दिला पाहिजे.मंत्रिमंडळविस्तारात माझा नंबर नक्की लागले.
राज्यात तीन चाकी महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार जून 2022 रोजी सत्तेवर आले.आता या डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली आहे.राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या गटाने सत्ताधाऱ्यांना साथ दिल्याने हे सरकार पुन्हा तीन चाकी सरकार झाले आहे.अजित पवारांवर टीका करूनच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते.आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी विकास निधी दिला नाही म्हणून शिंदेंनी बंड केलं होतं, मग आता परत अजित पवारांसोबतच काम करावं लागणार आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.त्यावर भरत गोगावले म्हणाले की, देशहित आणि राज्यहितासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले आहेत ते मान्य करणं क्रमप्राप्त आहे. त्यांना कोणतं खातं द्यायचं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील.पुढे बोलताना गोगावले म्हणाले नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती स्वीकारावी लागणार आहे. थोडीफार नाराजी राहणार आहे. ज्यांना एक भाकरी खायची होती, त्यांना अर्धी मिळाली, ज्यांना अर्धी खायची होती त्यांना पाव भाकरी मिळाली. सगळं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे समीकरण स्वीकारायला पाहिजे”, असं भरत गोगावले म्हणाले.
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील किती आमदारांना मंत्रिपदे मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. यावर भरत गोगावले म्हणाले की,या मंत्रिमंडळ विस्तारात मी नक्की मंत्री होईन.पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या नऊ मंत्र्यांमध्ये आम्ही होतो.परंतु, काही कारणास्तव आम्ही थांबलो.पण आता थांबायची वेळ येणार नाही. आता जो विस्तार होईल, त्यात आमचा नंबर लागेल
