घरांचे स्वप्न पूर्ण होते, हा विश्वास भाजपा शिवसेना युती सरकार देतेय, देवेंद्र फडणवीस यांना गिरणी कामगारांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद

घरांचे स्वप्न पूर्ण होते, हा विश्वास भाजपा शिवसेना युती सरकार देत आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गिरणी कामगारांनी टाळ्यांच्या कडकडाटात फडणवीस यांना दाद दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल यामधील पात्र गिरणी कामगारांना शुक्रवारी घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि गिरणी कामगार संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. मंत्री सुरेश खाडे, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, प्रकाश आबिटकर आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. एकूण 251 गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद ज्येष्ठ गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होता.गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत यासाठी समिती नेमली आहे. जे कामगार पात्र होतील त्यांना तातडीने चाव्या देण्याचा कार्यक्रम करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ठाणे जिल्ह्यात 43 हेक्टर जमीन निश्चित केली आहे. या ठिकाणी घरे बांधणे शक्य असेल तिथे घरे बांधून तयार केली जातील. घरे वाटप करण्याच्या आणि पात्रता निश्चित करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यामुळे नक्की किती घरे द्यायची आहेत ते समजेल; त्यापद्धतीने घरांची उपलब्धता निर्माण करता येईल. ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत, त्यांनाही लवकरच घरे मिळावीत यासाठी प्रयत्न चालू आहेत