महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकहिताचे प्रकल्प सूडबुद्धीतून बंद पाडले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले होते. त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, सर्वांना प्रचंड इगो होता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले होते. त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, सर्वांना प्रचंड इगो होता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मात्र शिवसेना भाजप युतीचे सरकार गेल्यावर्षी सत्तेत आल्यानंतर आम्ही या बंद करण्यात आलेल्या लोकहिताच्या प्रकल्पांना चालना दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ”महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास मंदावला होता. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करुन २०१४ च्या सरकारमधील लोकहिताचे प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची बोंब करत होती, मात्र कोणी निधी आणून देत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे प्रकल्प थंडावले होते.”मुख्यमंत्री म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे, गोऱ्हेंच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. शिवसेना भाजप युती मजबूत आहे व मनापासून झालेली आहे, हे यातून समोर आले आहे.

शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची बोंब करत होती, मात्र कोणी निधी आणून देत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे प्रकल्प थंडावले होते. आता राज्य पुन्हा प्रगतीपथावर वेगाने जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे, गोऱ्हेंच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. शिवसेना भाजप युती मजबूत आहे व मनापासून झालेली आहे, हे यातून समोर आले आहे. आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन हे युती सरकार आले आहे. वर्षभरात धडाकेबाज निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.