माझ्या अनुभवाएवढं रोहित पवारांचं वय नाही; वळसे पाटलांची रोहित पवारांवर टीका

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा गेले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील यांना शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? असे विचारण्यात आले. यावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. हा सामुदायिक निर्णय आहे. 40 आमदारांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा वेगळा निर्णय घेतला आहे.शरद पवारांची साथ सोडली, याचं मनामध्ये 100 टक्के दु:ख आहे. परंतु कधी-कधी असा निर्णय घ्यावा लागतो. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही, रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली, असं म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, त्यांचं वय रोहित पवार 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं.

रोहित पवार म्हणाले,साहेबांसोबत राहून काहींना साहेब कळलेच नाही. वळसे-पाटील पवार साहेबासोबत 40 वर्ष सोबत होते,पण त्यांना पवारांची भूमिका कळली नाही. वळसेंच्या वयाचा मान ठेवून काही गोष्टी बोलणार नाही भाजपनं आमच्यात भांडणं लावली आहेत.आम्ही भांडतोय भाजप एसीत बघून मज्जा बघतयं. जे चाललं हे योग्य आहे की नाही, हे जनता पाहत आहेत.हे फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही. तात्पुरती सत्ता मिळावी, म्हणून त्यांनी विचारसरणी सोडली,अशी टीका राष्ट्रवादीतील बंडखोरांवर रोहित पवारांनी केली आहे.