राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा; उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं

उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. फडणवीस यांचययावर हल्लाबोल करताना ते म्हणाले आहेत की, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक आहेत.’ त्यांच्या या टीकेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संपातले आहेत. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा, असं उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना झापलं आहे.

“श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही,” असे नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजप आता आक्रमक झुलायची पाहायला मिळत आहे. या टीकेनंतर नागपुरात भाजप आक्रमक झाला आहे. नागपूर विमानतळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागली होती. ही होर्डिंग भाजप कार्यकर्त्यांनी फाडली आणि होर्डिंग पायदळी तुडवले. एवढच नाही तर पोस्टरला काळं फासत भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध नोंदवला.