पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र बनत आहे की काय? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती गेल्या पंधरा दिवसांत दिसत आहे. पुणे शहरात गेल्या १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना अटक केली. या दोघांचा संबंध जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणाशी होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी शहानवाज फरार झाला होता. आता एनआयएने एका डॉक्टरास अटक केली आहे. हा डॉक्टर इसिससाठी तरुणांची भरती करण्याचे काम करत होता.अदनाली सरकार असे या डॉक्टरचे नाव आहे.
इसिसच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने संबंधित अनेक दस्तऐवज यासारख्या अनेक दोषी साहित्य जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकून डॉ. अदनान अली सरकार (43) याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कोंढव्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयएसआय शी संबंधित अनेक दस्तऐवज जप्त केले आहेत. हे डॉक्टर पुण्यातील तरुणांना प्रेरित करून आणि संघटनेमध्ये भरती करत असल्याचं समोर आलं आहे.
आयसिसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणं ही त्याची मुख्य जबाबदारी असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात हे मॉडेल पोहोचवण्यात डॉक्टर अदनाली याचा मोठा हात होता. याप्रकरणी आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एकाला अटक केलेली आहे.मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा, ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.
