न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला

मेरिकेच्या न्युयॉर्क शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकले आहेत. न्युयॅार्कमधल्या टाईम स्क्वेअरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला आहे. न्युयॅार्क शहरातील टाईम स्क्वेअरवर झळकणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी आहेत.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी एक जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचे फोटो न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.

राहुल कनाल हे आधी आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कनाल हे उद्योजक आहेत. काही दिवसांपूर्वी कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल या तिघांचे एकत्रित फोटो न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकले आहेत. त्यांच्या या फोटोची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरहा जगप्रसिद्ध आहे. या अतिशय गजबजलेल्या असलेला हा चौक गजबजलेला असतो. या ठिकाणी झालेली अनेक आंदोलने देखील प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आर्थिक महासत्तेचे हा चौक प्रतीक आहे. त्यामुळे या ठिकाणी फोटो झळकने ही मोठी बाब असते. अशा या चौकात फोटो लागणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.