एनआयएची चार राज्यांत छापेमारी; जिहादी दहशतवादी संघटनेच्या प्रकरणात कारवाई

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. एनआयएचे पथक कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. जिहादी दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कशी संबंधित प्रकरणात एनआयएचे पथक एकाच वेळी छापे टाकत आहेत.

दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या संशयावरून संशयितांच्‍या ठिकाणी शोधमोहीम सुरूच आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या 15 दहशतवाद्यांना 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागातून अटक केल्यानंतर अजूनही शोध सुरू ठेवण्यात आला होता. त्यानंतर एनआयएच्या पथकाने पुणे, मीरा रोड, महाराष्ट्रातील ठाणे आणि कर्नाटकातील बेंगळुरूसह अन्य 44 ठिकाणी छापे टाकले.

देशभरात १९ ठिकाणी एनआयएची छापेमारी रविवारी रात्रपासून सुरु केली आहे. त्या महाराष्ट्रातील अमरावतीच्या अचलपूरमध्येही एनआयएचे पथक पोहचले. महाराष्ट्र एटीएसला सोबत घेऊन अचलपूरमध्ये कारवाई सुरु केली. या कारवाईत काही जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवारी सकाळीसुद्धा सुरु होती. यावेळी या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गावा गावापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. यामुळे राज्यात दोन आठवड्यापासून धडक कारवाया सुरु आहेत. अचलपूरमधील कारवाईत मोठी माहिती एनआयएच्या हातात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

रविवारी रात्री एनआयएचे पथक अमरावतीमध्ये पोहचले. त्यांनी चौकशी सुरु केली. जिहादी आतंकवाद्यांना मोडीत काढण्यासाठी एनआयएने ऑपरेशन सुरु केले. कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड आणि नवी दिल्लीत एनआयएची ही कारवाई सुरु आहे. कर्नाटकमधील ११ ठिकाणी छापेमारी सुरु आह.