मोदीच नाही तर राजीव गांधीही म्हणाले होते भ्रष्टाचारात जातात रुपयातले 85 पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजनेचे 21 हजार कोटी रुपये एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. आज काँग्रेसचे सरकार असते तर २१ हजार कोटी रुपयांतून १८ हजार कोटी रुपये लुटले गेले असते’, असा घणाघात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला. याचे कारण सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले काँग्रेसच्या काळात दिल्लीवरून एक रुपया पाठवला तर त्यातील 15 पैसेच शेतकऱ्यांच्या हातात पोहोचायचे. उर्वरित पैसे भ्रष्टाचारात गडप होऊन जायचे. आता दिल्लीहून पाठविलेली पै ना पै खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते.

काँग्रेसवर टीका करायची म्हणून मोदी हे बोलले नाहीत तर काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी देखील हेच म्हणाले होते. स्वतःच्या पक्षाच्या पंतप्रधानांनीच असे म्हटल्याने त्यावेळी काँग्रेस वाल्यांना चांगलीच मिरची लागली होती.

राजीव गांधी हे राजकारणात नवखे होते. ओडिशातील एका सभेत बोलताना नुकतेच पंतप्रधान झालेले राजीव गांधी म्हणाले दिल्लीतून एक रुपया पाठवला तर लोकांपर्यंत फक्त पंधरा पैसे पोहोचतात. देशात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. अगदी ग्रासरूट लेव्हल पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे अशक्य असल्याची हतबलता राजीव गांधींनी व्यक्त केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन अकाउंट, जाम आणि आधार कार्ड या आमच्या आधारे संपूर्ण भ्रष्टाचार संपवून टाकला. त्यामुळेच दिल्लीतून पाठवलेला सर्व पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागला.

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यात यवतमाळ येथील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री शरद पवार होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते.