रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस’च्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, 2024 या वर्षात सुमारे 11 लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून वीजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आजचा हा दिवस प्रत्येकाच्या इच्छाशक्तीमुळे पाहायला मिळत आहे. देशातील तरुण ठरवतील त्यांना कसा देश हवा आहे, कशा पद्धतीची रेल्वे हवी आहे. पुढील 10 वर्षांच्या कामाचा हा तर फक्त ट्रेलर आहे, मला तर आणखी पुढे जायचं आहे, वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात आगामी निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं जातंय. आज नरेंद्र मोदींनी एकूण 10 नवीन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 11 लाख कोटींच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. यातील 85 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भुमिपूजन आम्ही करत आहोत. विकासचा हा चढता आलेख मला कमी होऊ द्यायचा नाही, असं मोदी म्हणाले.

आज गुजरात आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही योजना सुरू करत आहोत. वोकल फॅार लोकल योजना सुरू करून स्थानिकांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतीय रेल्वेला मोठे करण्यासाठी इच्छा शक्ती हवी जी आमच्या सरकारमध्ये आहे. आपल्या इन्फ्रास्ट्रकचरमध्ये खूप वाढ झाली. येत्या काळात तुम्हाला दिसले की त्यात अजून किती युधारणा होते, विकासकामांबाबत अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.