सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमधील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत २४५ कोटी रुपयांचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मुख्य संशयित हा कवठेमंकाळ तालुक्यात असून तो गेल्या १७ वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. मुख्य संशयित एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती. एमडी ड्रग्ज साखळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक करण्यात आले आहे.
या कारवाईबाबत पोलिसांना मोठी गोपनीयता बाळगली आहे. सांगलीमध्ये यापूर्वीदेखील ड्रग्जशी संबंधित ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली होती. आता पुन्हा एकदा ड्रग्जचं सांगली कनेक्शन पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मागच्या काही महिन्यांपासून पुणे आणि परिसरात ड्रग्जचे साठे सापडत आहेत. त्यामुळे देशभरातील ड्रग्जचं कनेक्शन पुढे आलेलं होतं. यात हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांना मिळून आलेलं. आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्याने तिथे किती साठा सापडतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
दिनांक 11 मार्च रोजी पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली आणि सांगली येथे कारवाई करत जवळपास 3,600 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक देखील केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये पाच व्यक्ती पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामध्ये दोन व्यापारी हे पुण्यातील तर एक व्यापारी आणि दोघे सराफा व्यावसायिक हे दिल्लीतील होते. यांच्यामार्फत मुख्य आरोपी संदीप धुनिया ड्रग प्रकरणातील पैशांचे व्यवहार करत होता.
