पाकिस्तानच्या दुसऱ्या मोठ्या नौदल एअरबेसवर मोठा हल्ला

पाकिस्तानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला झाला आहे. तुरबतमधील पीएनएस सिद्दिकी नौसेना तळावर हा हल्ला झाल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलंय. बंदी असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) माजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला माजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान या प्रदेशातील मालमत्तेचे शोषण करत असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. द बलुचिस्तान पोस्टनुसार, बीएलएने दावा केला आहे की त्यांचे लढाऊ सैनिक एअरबेसमध्ये घुसले आहेत. याशिवाय या तळावर चिनी ड्रोनही तैनात आहेत. हल्ल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी केच यांनी टीचिंग हॉस्पिटल तुर्बतमध्ये आणीबाणी लागू केली, असून सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर हजर राहण्यास सांगितले आहे.

चीन आणि पाकिस्तान त्या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मनमानी पद्धतीने वापर करतात असाही माजीद ब्रिगेडचा आरोप आहे. द बलूचिस्तान पोस्टनुसार, हल्लेखोर एअरबेसमध्ये घुसल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ने केला. त्याशिवाय या एअर बेसवर चिनी ड्रोन सुद्धा तैनात आहे. हल्ल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने टीचिंग हॉस्पिटल तुरबतमध्ये आणीबाणी जाहीर केली. सर्व डॉक्टर्सना तात्काळ ड्युटीवर बोलवून घेतलं.बीएलएच्या मजीद ब्रिगेडने तुर्बतमध्ये आठवडाभरात हा दुसरा हल्ला केला असून या वर्षातील तिसरा हल्ला आहे. याआधी 29 जानेवारीला ग्वादर येथे हल्ला झाला होता. 20 मार्चला पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर असाच हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अनेक स्फोट झाले. या लढाईत दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ दहशतवादी ठार झाले.

ग्वादर बंदर हे पाकिस्तान आणि चीनमधील महत्वाच्या इकॉनॉमिक कॉरिडोरचा भाग आहे. डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये विशेषत: खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पाकिस्तानमधील बंदी असलेली दहशतवादी संघटना तेगरिक-ए-तालिबानसोबत युद्धविराम रद्द झाल्याने या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.