महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 17471 जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. आता पोलीस भरतीसाठी तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी एकूण 17471 रिक्त पदांसाठी कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून अधिकृत सूचना डाउनलोड करू शकतात. इच्छुकांनी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचनेा काळजीपूर्वक वाचावी.

शारीरिक चाचणी, कौशल्य चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेतून जेल कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन आणि सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल ही पदे भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरतीसाठी अर्ज दाखल करण्याऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवाराने अधिकृत अधिसूचना वाचावी.अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.खुल्या प्रवर्गातील लोकांना 450 रुपये भरावे लागतील.तर, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 350 रुपये भरावे लागतील.