खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स

गटाने आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असून नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने किर्तीकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

अमोल कीर्तिकर यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकर आधीच अडचणीत सापडले आहेत, त्यांचे पाय आणखी खोलात जाणार का अशी चर्चा असतानाच ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने चर्चा सुरू झाली आहे. एकडीकडे उद्धव ठाकरे आणि गटातील नेते हे भाजपव टीका करत आहेत आणि दुसरीकडे खिचडी घोटाळा प्रकरणी इडीचं समन्स दिलेल्या नेत्यालाच उमेदावीर जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

कोरोना काळात खिचडी घोटाळा झाल्याचे आरोप अमोल कीर्तीकर यांच्यावर करण्यात आले आहेत. ईडीकडून त्यांना समन्स बजवण्यात आले आहे. अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. सुमारे पाच तास त्यांची चौकशी झाली. शिवसेनेतील फुटीनंतर गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात दाखल झाले आहेत, तर त्यांचे पूत्र अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटात आहेत.

खिचडी घोटाळाप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर, ठाकरे सेनेचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर, ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची चाैकशी केली आहे.