लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए) च्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पियूष आनंद यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दल च्या डायरेक्ट जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून बुधवारी 27 मार्च रोजी या नियुक्तांबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. आयपीएस राजीव कुमार शर्मा यांना ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
दिनकर गुप्ता एनआयएचे महासंचालक होते. ते 31 मार्च रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते यांच्याकडे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. सदानंद वसंत दाते कोण आहेत आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊया.
सदानंत दाते यांचं नावं आणखी एक गोष्टीसाठी चर्चेत आहे. 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबई हल्ल्याच्या वेळी आयपीएस सदानंद देते हे पहिल्या काही अधिकाऱ्यांमध्ये होते. त्यांचं धाडस, शौर्य, कौशल्य आणि त्यांच्या युक्तीमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले.सीएसटी येथील कामा आणि एल्बलेस रुग्णालयात ते दहशतवाद्यांशी लढत होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमीदेखील झाले होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
सदानंद दाते हे 1990 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगढच्या गडचिरोलीमध्ये नक्षली मोर्चाच्या काळातही तैनात होते. तर, फेब्रुवारीमध्ये सीआरपीएफमध्ये त्यांना आयजीपदी बढती मिळाली होती. त्यांना सीआरपीएफचे स्पेशल आयजी बनवले होते. त्यानंतर डीजी म्हणून ते सीआरपीएफमध्ये पाच वर्ष नियुक्त होते. आता त्यांच्या हाती एनआयएची धुरा सोपवण्यात आली आहे.
सदानंद दाते एटीएस प्रमुख असताना एनआयएने महाराष्ट्र काही महत्वाची आणि प्रमुख ऑपरेशन राबवली.पुण्यातील आयसीस प्रकरण तसेच पडघा जवळील बोरिवली गावातील आयसीएस प्रकरण ही मोठी ऑपरेशन झाली होती.

