मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची मोठी घोषणा केली. महायुतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे फोटो छापण्यात आले आहेत. इतकंच नाहीतर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे यांच्या फोटोनंतर रामदास आठवले रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रचार पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. साधारण रोजच्या दौऱ्याचं प्रचार पत्रक जाहीर करण्यात येतं. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा दौरा कोणत्या गावात आहे. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन कसं असेल?, याची माहिती देणारं हे प्रचार पत्रक असतं. या प्रचार पत्रकात आता राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी म्हणजे काका शरद पवारांची साथ सोडल्यानंतर बारामतीची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार निवडणुकीच्या रिंगण्यात उभा राहिल्या आहेत. अशात जेव्हा राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीसाठी का होई ना महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे अजित पवार यांनी महायुतीतील काही जांगाबद्दल तिढा असल्याचं बोलं आहेत. सातारा आणि नाशिक या जागांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याच त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, सातारा आणि नाशिकचे सगळं व्यवस्थित होईल. त्याबाबत काळजी करु नका. राज ठाकरेंच्या पाठिंब्याने महायुतीला नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवारांचा सध्या दणक्यात प्रचार सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच सुनेत्रा पवार विविध गावभेटी घेताना दिसत आहे. शिवाय त्यांच्या प्रचारासाठी विजय शिवतारेदेखील मैदानात उतरले आहेत. त्यांनी काल सासवडमध्ये सभा आयोजित केली होती. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. तिघांनीही सुनेत्रा पवारांनाच मतदान करा, असं आवाहन केलं आहे.
