भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पदाधिकार्यांचे गैरसमज दूर करत समजूत काढण्यात आली असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांचे सर्व गैरसमज दूर केले. यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भविष्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीही गैरसमज झाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.तसेच ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समज गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
तसेच ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समज गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
