सुनील राऊत आणि भावेश भिडेचे काय संबंध? नितेश राणेंचा सवाल

मुंबईत काल एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपर छेडा नगर येथे पेट्रोल पंपावर एक भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 14 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. आता यावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीच होतं, त्याच्या मालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. भावेश भिंडे असं या होर्डिंग कंपनीच्या मालकाच नाव आहे. त्याचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये तो उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसतोय. यावरुन आता सत्ताधारी पक्ष उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहे. काल संध्याकाळी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यावेळी पेट्रोल पंपावर आडोशाला थांबलेल्या लोकांवर तसेच इंधन भरण्यासाठी आलेल्या गाड्यांवर हे भलंमोठ होर्डिंग कोसळलं.

या दुर्घटनेत आत्तापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पण आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीचे होते, त्या कंपनीचा मालक भावेश भिडे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचे काय संबंध आहेत, असा प्रश्न भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे यांनी या दुर्घटनेवरून संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. भावेश भिडे हा कोणाचा पार्टनर आहे? संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचे नेमके काय संबंध आहेत? भावेश भावेबरोबर सुनील राऊत यांनी मातोश्रीवर गेला होता का आणि तिथे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोटो काढला होता का? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. होर्डिंग असणाऱ्या कंपनीला अगोदरच मुंबई महापालिकेने नोटीस देऊन टाकलेली. यात तुमचा होर्डिंग लावण्याचा कार्यकाळ संपला आहे, होर्डिंग काढून टाका असं सांगितलं होतं. पण तरीही त्या मालकाने ऐकलं नाही. त्या मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं आम्ही ऐकतो. हे भावेश भिंडे कोणाचे पार्टनर आहेत? संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी भिंडेंचे काय संबंध आहेत? , असा सवालही आमदार नितेश राणे यांनी केला आहे.