18 व्या लोकसभेसाठी लोकसभा 2024 च्या सर्वसाधारण निवडणूकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणूकांचे चार टप्पे पार पडले आहेत. चौथा टप्प्यात महाराष्ट्रात 11 लोकसभा जागांवर मतदान झाले. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी, बीड अशा मतदार संघासाठी मतदान आहे. आता लोकसभा निवडणूकांचा मुंबई आणि ठाणे या दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मतदार संघात निवडणूका होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सभा ठेवण्यात आली आहे. येत्या उद्या (15 मे) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण पश्चिमेत येत आहेत. त्यासाठी वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात अनेक बदल केले आहेत.
नरेंद्र मोदी यांचा उद्या (15 मे) मुंबईत रोड शो असल्यामुळे उद्या दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या एल.बी.एस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण एल.बी.एस मार्ग व एल.बी.एस मार्ग ला जोडणारा मुख्य रस्त्या पासून 100 मीटर अंतरापर्यंत 14 आणि 15 तारखेला नो पार्किंग करण्यात आला आहे.
पुढील मार्गात तात्पुरता स्वरूपात बदल
अंधेरी-घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक
गोळीबार मैदान-घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक
हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शनकडे येणारी वाहतूक
नरेंद्र मोदींचा घाटकोपर-मुलुंड दौरा
नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. जिथं विद्यमान खासदार मनोज कोटक यांना तिकिट नाकारून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. मिहिर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे. त्यामुळे या रोड शोचा फायदा मिहिर कोटेचा यांना होऊ शकतो.
अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक आणि हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्समधून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शनकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिला दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेले मिहीर कोटेचा यांना याचा फायदा होणार आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे आव्हान असणार आहे.
मुंबईतल्या रोड शो नंतर 17 मे रोजी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऐतिहासिक सभा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच जाहीर सभेत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे, त्याआधी शनिवार 18 मे रोजी इथे आचारसंहिता लागेल, त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावतील.
