पहिल्या चार टप्प्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पहिल्या चार टप्प्यातच आपण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला आहे. अभूतपूर्व विजयाकडे आपली वाटचाल सुरु आहे. २०१४ नंतर देशासोबत मुंबईत झालेला बदल आपण सर्वांनी बघितला आहे. २०१४ नंतर आपल्याला मुंबईत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अनेक बदल आपण त्याठिकाणी केले. सर्व म्हाडाचा परिसर आहे. या म्हाडाच्या ५६ वसाहतींमध्ये आम्ही सेवा शुल्क माफ केला. ३८० कोटी रुपयांचा भुर्दंड संपवण्याचं काम केलं आहे. सामान्य मुंबईकराला घर मिळालं पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी मुंबईत राज्य केलं. मुंबईवर २५ वर्ष राज्य केल्यानंतरही सामान्य मुंबईकरांच्या घराचा प्रश्न तुम्ही का सोडवू शकले नाहीत? त्याच्या जीवनात तुम्ही परिवर्तन का आणू शकले नाहीत, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. ते उत्तर-मध्य मुंबईत महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

आपला प्रयत्न आहे, सामान्य मुंबईकरांना घर मिळालं पाहिजे. आज ज्यांनी २५ वर्ष मुंबईवर राज्य केले त्यांना प्रश्न आहे, त्यांनी २५ वर्षात जो मुंबईकर राहतो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. मुंबईतील जवळपास १४ हजार बिल्डिंगच्या विकास करण्याचे आपण कायदा केला. २०१४ नंतर आपण मुंबई मध्ये मेट्रोचे नेटवर्क आपण तयार केले. सांडपाण्यावर प्रक्रिया होत नव्हती. ते तसंच समुद्रात जायचं. आपण त्यावर प्रक्रिया केली. ही गल्लीची निवडणूक नाही. साधी निवडणूक नाही. इथे आपल्याला देशाचे पंतप्रधान निवडायचे आहेत. आता महाभारत सारखी परिस्थिती झाली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज काँग्रेसचे लोक बोलतात की, कसाबने करकरे यांना मारले नाही. त्यांना कसाबच्या बदनामीची भीती आहे. ज्यावेळी शिक्षा झाली. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. अरे नालायकांनो राजकारण करायचे तर करा. पण शहिदांचे राजकारण करू नका. आज काँग्रेसचा पंजा कसाबसोबत तर महायुती उज्ज्वल निकम यांच्यासोबत आहे. कुर्ला असेल किंवा उत्तर मध्य असेल परीक्षा उज्ज्वल निकम यांची नाही तर तुमची आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्याला आपल्या मतांच्या मदतीने फैसला करायचा आहे. मी विरोधकांना म्हटलं तुमचे नेते कोण? यदाकदाचित तुमचं सरकार निवडून दिले जनतेने तर तुमचा नेता कोण? तर त्यांचा पोपटलाल म्हणतो की, आम्ही ५ निवडू, मला असं वाटतं हे संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील. अरे ही काय घंटा खुर्चीची निवडणूक नाही. तिकडे कोण आहे? फक्त इंजिन आहे. मनसेचं नाही. हा मनसे आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडे फक्त राहुल गांधींचं इंजिन आहे. मात्र इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.