Skip to content

गल्ली ते दिल्ली

समाचार और मीडिया वेबसाइट

  • Home
  • राज्य
  • देश
  • अर्थ/कृषी/उद्योग
  • जिल्हा
  • संपादकीय
  • आंतरराष्ट्रीय
  • क्रीडा
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • Home
  • 2025
  • May
  • 15
  • अंजली दमानियांवर सुपारीबाज आणि रिचार्जवर चालणारी बाई वक्तव्यामुळे सूरज चव्हाण अडचणीत
राज्य

अंजली दमानियांवर सुपारीबाज आणि रिचार्जवर चालणारी बाई वक्तव्यामुळे सूरज चव्हाण अडचणीत

May 15, 2025
gallitedelhi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता कायदेशीर कारवाईचा फटका बसू शकतो. “सुपारीबाज आणि रिचार्जवर चालणारी बाई” अशा शब्दांत त्यांनी दमानिया यांच्यावर टीका केली होती. याच प्रकरणी वांद्रे कोर्टाने गुरुवारी सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली असून २८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Suraj Chavan in trouble for his statement on Anjali Damania a betel nut seller and a woman who runs on recharge)

सूरज चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर २५ खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही न करता वर्षाला १५ देश फिरणारी आणि अडीच कोटींचा टॅक्स भरणारी ही स्वयंघोषित समाजसेविका कोणाच्या माध्यमातून रिचार्ज झाली, हे लवकरच उघड करणार आहोत.” या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या अंजली दमानिया यांनी वांद्रे कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली. गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने चव्हाण यांना नोटीस बजावली आणि त्यांच्या उपस्थितीचे आदेश दिले.

दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी आरोप केला होता की, मंत्रिमंडळाची मंजुरी न घेता खोटा शासनादेश काढून शेकडो कोटींची रक्कम लाटली गेली. यावरच चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती.

सुनावणीनंतर अंजली दमानिया म्हणाल्या, “मी ‘सुपारीबाज’ आणि ‘रीचार्जवर चालणारी बाई’ असल्याचा आरोप केला गेला. मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देते की, माझ्या सर्व बँक खात्यांची तातडीने चौकशी करा. जर मी भ्रष्ट असेन, तर मला शिक्षा झालीच पाहिजे, पण नसेल तर सूरज चव्हाण यांना कायदेशीर शिक्षा दिली गेली पाहिजे. महाराष्ट्राच्या मीडियाला जर खरंच माझ्या लढ्याबद्दल आदर वाटत असेल, तर आजच या मुद्द्यावर फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रतिक्रिया द्यावी.”

Tags: "Legal Action", Ajit Pawar, Anjali Damania, bank account investigation, Defamation Case, Devendra Fadnavis, Dhananjay Munde allegations, legal notice, maharashtra Government, Maharashtra Politics, marathi news, NCP Ajit Pawar faction, Political Controversy, social activist, suraj chavan, Vandhre court

Post navigation

पाकिस्तानमधून धमकी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भारत घुसून मारणारा देश!
संजय राऊत यांची ‘पुस्तक डिप्लोमसी’: बाळासाहेबांनी मोदी-शहा यांना मदत केल्याचा ‘ वास्ता ‘ देत उद्धव ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न!

State News

आंतरराष्ट्रीय देश राज्य

“व्हँकुव्हरमध्ये अडकलेल्या भारतीयाला मायदेशी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार; प्रशासनाच्या तत्परतेचे उदाहरण”

July 28, 2026
Author

“व्हँकुव्हरमध्ये अडकलेल्या भारतीयाला मायदेशी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार; प्रशासनाच्या तत्परतेचे उदाहरण” परदेशात शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीसाठी गेलेल्या भारतीय नागरिकांना अनेकदा व्हिसा, कागदपत्रे किंवा कायदेशीर प्रक्रियांशी संबंधित अनपेक्षित अडचणींचा…

राज्य

भांडेवाडी प्रकल्प देशातील स्वच्छता क्रांतीचे नवे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 1, 2026
Author
राज्य

नसरापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

May 7, 2026
Author
देश राज्य

हा ममता बॅनर्जींचा पराभव नाही, हा मोदी शहांचा लोकशाही विरोधी कट, संजय राऊत यांचे हास्यास्पद विधान !

May 6, 2026
Author
राज्य संपादकीय

धोरणाधारित विकास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगवान वाटचाल

April 30, 2026
gallitedelhi

You may Missed

मनोरंजन

धुरंधर ट्रेलरवरील प्रचंड मागणीनंतर ‘इश्क जलाकर – कारवाँ’ प्रदर्शित

November 26, 2025
gallitedelhi
मनोरंजन

शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

November 23, 2025
gallitedelhi
मनोरंजन

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये दिसणार कलाकारांची भक्कम फौज!

September 17, 2025
gallitedelhi
मनोरंजन

३०० वर्षांनंतर ती परत येतेय… स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी गूढ मालिका ‘काजळमाया’

September 17, 2025
gallitedelhi

Latest News

आंतरराष्ट्रीय देश राज्य

“व्हँकुव्हरमध्ये अडकलेल्या भारतीयाला मायदेशी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार; प्रशासनाच्या तत्परतेचे उदाहरण”

July 28, 2026
Author
राज्य

भांडेवाडी प्रकल्प देशातील स्वच्छता क्रांतीचे नवे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 1, 2026
Author

Social Media

  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • WhatsApp

Categorices

  • अर्थ/कृषी/उद्योग (75)
  • आंतरराष्ट्रीय (111)
  • क्रीडा (59)
  • ग्रामीण (2)
  • जिल्हा (350)
  • देश (789)
  • मनोरंजन (70)
  • राज्य (5,514)
  • शिक्षण (33)
  • संपादकीय (27)
  • सांस्कृतिक (24)

Recent Post

आंतरराष्ट्रीय देश राज्य

“व्हँकुव्हरमध्ये अडकलेल्या भारतीयाला मायदेशी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार; प्रशासनाच्या तत्परतेचे उदाहरण”

July 28, 2026
Author
राज्य

भांडेवाडी प्रकल्प देशातील स्वच्छता क्रांतीचे नवे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 1, 2026
Author
राज्य

नसरापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

May 7, 2026
Author
देश राज्य

हा ममता बॅनर्जींचा पराभव नाही, हा मोदी शहांचा लोकशाही विरोधी कट, संजय राऊत यांचे हास्यास्पद विधान !

May 6, 2026
Author
Copyright © 2026 गल्ली ते दिल्ली