खोटे बोलणे सोडा, आत्मपरीक्षण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला!

विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधी जोपर्यंत जमिनीवर उतरणार नाही, खोटं बोलणं सोडणार नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष जिंकणार नाही. त्यामुळे खोटे बोलणे सोडा, आत्मपरीक्षण करा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला आहे. ( Stop lying do introspectionChief Minister Devendra Fadnavis advice to Rahul Gandhi!)

राहुल गांधी यांनी आज विविध दैनिकात लेख लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या आधी देखील राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे झालेल्या कार्यक्रमात भारताच्या निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारताच्या लोकशाहीची बदनामी करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न असून ते महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा अपमान करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या आरोपांना ‘बिनबुडाचे’ आणि ‘लोकशाहीची बदनामी करणारे’ असे संबोधले आहे. त्यांनी म्हटले की, “राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून देशाची प्रतिमा मलीन केली आहे. राहुल गांधींचे हे आरोप त्यांच्या निवडणूक पराभवामुळे आलेल्या नैराश्याचे प्रतीक आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण करून जनतेचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करावा.”

फडणवीस म्हणाले , राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे. जोवर राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाही. स्वतःची जोड खोटं बोलणं सोडणार नाही कुठे आश्वासनाने दिलासा देणे सोडणार नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही. त्यांना जागा व्हावे लागेल समजून घ्यावे लागेल. अशा पद्धतीने ते नेहमी खोटे बोलत असतात. मतदारांचा अपमान करत असतात. राहुल गांधीने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला .

राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसतं ऐकणाऱ्या समजत नाही त्यावर मी काय प्रतिक्रिया देणार असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात यापूर्वी त्यांनी असा आरोप केलेला आहे. निवडणूक आयोगाने सप्रमाण आकडेवारी दिली आहे. राहुल गांधी खोटे बोलून स्वतःच्या मनाला समजावतात जोपर्यंत हे सत्य स्वीकारून जागे होऊन जमिनीवर काम करणार नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलाही भवितव्य उरलेलं नाही. स्वतःशी खोट बोलून स्वतःला दिलासा देण्याच काम राहुल गांधी करत आहे.