ड्रग्ज तस्करीमधून प्राणघातक हल्ला, दोन मित्रांमध्ये हाणामारी

विशेष प्रतिनिधी

पुणे : मेफेड्रोन हे ड्रग्ज विकत घेण्यावरून दोन मित्रांमध्ये हाणामारी झाली असून खरेदी करण्यासाठी आलेल्या चार तरुणांवर लोखंडी हत्याराने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना लक्ष्मी रस्त्यावर कॉर्टर चौकाच्या पुढे असलेल्या सिटी चर्च समोर मंगळवारी घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( Drug trafficking leads to fatal attack fight between two friends)

आकाश उणेचा आणि चैतन्य अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राहुल बंडू पवार (वय २१, रा. काळेपडळ पोलीस स्टेशन शेजारी, वाडकर मळा, महंमदवाडी, मूळ रांजणी, बीड) याने फिर्याद दिली आहे. या घटनेमध्ये फिर्यादी राहुल पवार, गौरव नितीन साठे आणि राजा मुन्ना पंडित हे तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी पवारवर यापूर्वीचा बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. तर, आकाश उणेचा हा ‘डीजे’ प्लेअर आहे. तसेच, तो छोटीमोठी कामे करतो. तो मेफेड्रोन विकत असल्याचे समोर आले आहे.

आरोपी आणि फिर्यादी व त्यांचे मित्र एकत्रच क्वार्टर गेट परिसरामध्ये आले होते. त्यावेळी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनी आकाश उणेचा आणि चैतन्य या दोघांकडून एमडी खरेदी करण्यासाठी त्यांना पैसे देऊ केले. आरोपींनी फिर्यादीकडून पैसे घेतले. मात्र, त्यांना एमडी पावडर दिली नाही. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाले. त्याचे पर्यावरण हाणामारीमध्ये झाले. त्यानंतर फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडे हत्यारांनी त्यांच्यावर वार करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *