विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा आरोपी अश्विन कुमार सुप्रा याला नोएडामधून अटक करण्यात आली आहे.आरोपीला मुंबई क्राईम बँचने मुंबईत आणलं आहे.
( Accused who threatened to bomb Mumbai arrested from Noida)
नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा (वय ५०) आहे. तो मुळचा बिहारचा असून मागच्या पाच वर्षांपासून नोएडात राहत आहे. धमकी देण्यासाठी आरोपीने वापरलेला फोन, आणि सीम कार्ड जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आता या प्रकरणाची पुढील चौकशी करतील.
दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाची लगबग असताना मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि ४०० किलो आरडीएक्स पेरल्याचा संदेश प्राप्त झाला होता. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर हे विघ्न आता दूर झाले आहे.
