‘व्यंकटेश्वरा कन्स्ट्रक्शन कंपनी’कडून मोठी आर्थिक फसवणूक, दोन दुकाने, एक ऑफिसच्या मोबदल्याच्या बदल्यात उकळली लाखो रुपयांची रक्कम

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाची ८५ लाखांची आर्थिक फसवणूक करीत त्याला आणि कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पामध्ये १ कोटी ७६ लाख ६५ हजार रुपयांच्या दोन दुकानांच्या बुकिंगसाठी ८५ लाख ९० हजार रुपये घेऊन देखील ग्राहकाला ही दुकाने ठरलेल्या वेळेत न आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
( Major financial fraud byVenkateshwara Construction Companylakhs of rupees were embezzled in exchange for two shops and an office)

याप्रकरणी ‘व्यंकटेश्वरा कन्स्ट्रक्शन कंपनी’ या बांधकाम व्यावसायिक फर्मच्या अरविंद भालेकर, महादेव भालेकर यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१८ ते दिनांक २२ सप्टेंबर २०२१ दरम्यान वेळोवेळी द ग्रॅण्ड मॅजेस्टिक या प्रोजेक्टमध्ये घडला.

व्यंकटेश्वरा कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार अरविंद शिवाजी भालेकर, रमजान हिदायतुल्ला शेख, किरण भानुदास पवार, महादेव शिवाजी भालेकर, संदिप नामदेव कासार, मानसी अमित शिंदे, नितीन नामदेव कासार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र मच्छिंद्र ठोमके (वय ४४, रा. गोल्ड अंबर, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. यातील अरविंद आणि महादेव भालेकर यांचा एसआयके हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने आणखी एक व्यवसाय आहे. कात्रज-नऱ्हे रस्त्यावरील आंबेगाव बुद्रुकमधील दळवी नगर येथे ‘द ग्रॅण्ड मॅजेस्टिक’ नावाचा बांधकाम प्रकल्प सुरुऊ करण्यात आला होता. या प्रकल्पामधील दुकान क्रमांक ५ व ६ आणि ऑफीस क्रमांक २०३ याची विक्री करण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादीशी चर्चा केली. एकूण १ कोटी ७६ लाख ६५ हजार ३९९ रुपयांच्या मोबदल्यापैकी ८५ लाख ९० हजार रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले. ही दुकाने व ऑफीस फिर्यादीला ठरलेल्या वेळेमध्ये न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. तसेच, फिर्यादीस व त्यांच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *