पीटबुलसह तीन कुत्र्यांचा तरुणावर हल्ला

विशेष प्रतिनिधी

पुणे : उद्यानामध्ये सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या तरुणावर एका पिटबुलसह तीन कुत्र्यांनी हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सहकारनगरच्या शिवदर्शन येथील बागुल उद्यानामध्ये बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Three dogs including a pitbullattack a young man)

याप्रकरणी गणेश भारत जाधव (वय ३८, रा. धनकवडे इमारत, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव बुधवारी सकाळी बागुल उद्यानात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन तांबूस रंगाची व राखाडी रंगाचा पिटबुल जातीच्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडावर, पंजावर, मनगटावर तसेच गळ्यावर व चेहऱ्यावर चावा घेऊन गंभीर जखमी केले. श्वान मालकाने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो याची माहिती असताना देखील कुत्र्यांना मोकळे सोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *