पाषाणच्या ‘गोल्डन स्पा’वर छापा, बेकायदा वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

विशेष प्रतिनिधी

पुणे : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी छापा टाकून बेकायदा वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. पाषाण येथील ‘गोल्डन स्पा’वर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या स्पामधून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.
( Raid on Pashans Golden Spa illegal prostitution business exposed)

अमर दत्तु कांबळे (वय, ४०, रा. निसर्ग श्रृष्टी बिल्डिंग, दुसरा मजला, आंबेगाव पठार) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ईश्वर म्हातारदेव आंधळे यांनी फिर्याद दिली आहे. पाषाण-सुस रस्त्यावरील साई चौकात असलेल्या मंत्री रेसीडेन्सीमध्ये असलेल्या ‘गोल्डन स्पा’मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी छापा टाकण्यात आला.

तेव्हा पिडीत महिलांना वेश्या व्यवसायाकरिता प्राप्त करुन घेऊन त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी फ्लॅट मालकाला न कळविता हा फ्लॅट स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणेकरिता उपलब्ध करुन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *