रोजगाराच्या निमित्ताने महिलांना पुण्यात आणून बळजबरी वेश्याव्यवसाय, महिलांचे शोषण करणाऱ्या पती-पत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून बेड्या

विशेष प्रतिनिधी

पुणे : रोजगाराच्या शोधात असलेल्या गावाकडील भोळ्याभाबड्या महिलांना ब्युटी पार्लरचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यात आणून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या कामात पती-पत्नी सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या जोडगोळीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.
( Bharati University police arrest husband and wife who forced women to prostitution and exploited them by bringing them to Pune on the pretext of employment)

भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी भान्यासं १४३, १२७(२), १२७ (३), ११५ (२), ३५१(२), ३५२, ३ (५), पिटा ४, ५, ६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार २०२३ ते आजरोजी पर्यन्त बुधवार पेठ, आंबेगाव पठार, आळंदी येथील लॉजवर सुरू होता.

मिरा राजू चिद्रवार-पाटील, राजू चिद्रवार-पाटील अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २२ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीला ब्युटी पार्लरचे काम लावून देतो असे आमिष दाखवीत गावावरुन पुण्यात आणले. त्यांना ब्यूटी पार्लरचे काम मिळवून न देता त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून या व्यवसायामधून मिळणारी रक्कम आरोपींनीच ठेवून घेतली. तसेच, या तरुणीला डांबून ठेवत त्यांना शिवीगाळ, मारहाण केली. त्यांना सातत्याने धमकावत त्यांचा छळ व पिळवणूक केली. तसेच, मागील आठवड्यात आरोपींनी आणखी एका पिडीत महिलेला पुण्यात आणले असून तिच्याकडुन देखील जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार खिलारे म्हणाले, की फिर्यादीने पोलिसांना याविषयी माहिती दिली होती. त्यानुसार आपण छापा टाकून कारवाई केली आहे. यासोबतच, पिडीत महिलेने देखील तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *