डीसीएन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड: शहरातील चोविसावाडी फायर स्टेशन येथे मंगळवारी सायंकाळी व्यायाम करत असताना अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. तनिष्क पार्क सोसायटी, चऱ्होली) असे मृत जवानाचे नाव आहे.
( Firefighter Dies During WorkoutSuspected Heart Attack at Chowvisawadi Fire Station)
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजेश राऊत हे नेहमीप्रमाणे फायर स्टेशनमधील जिममध्ये व्यायाम करत होते. व्यायामादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने “थोडावेळ आराम करतो” असे सांगून ते खाली आले. काही वेळानंतर सहकाऱ्यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.
सहकाऱ्यांनी त्वरित त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे अग्निशामक दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
