बालभारती-पौडफाटा रस्त्यासाठी पुन्हा नवीन आराखडा? भुयारी मार्गाची केली जाणार चाचपणी; पालिका-पर्यावरण प्रेमींमध्ये पुन्हा संघर्ष!

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे – वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौडफाटा या पर्यावरण परवानगी मिळाल्यास महापालिका उन्नत मार्ग व जमिनीवरून असा मिश्र पद्धतीने रस्ता करू शकणार आहे. मात्र, या टेकडीवरून भुयारी मार्ग करता येऊ शकतो का याची चाचपणीही केली जाणार असल्याचं आता समोर आलं आहे. ( New plan for Balbharti-Paudaphata road again Subway will be tested Conflict between municipality and environmentalists again!)

मात्र, या ठिकाणी भुयारी मार्ग करणे अशक्य आहे हे अभ्यासातून पुढे आल्यानंतर संमिश्र आराखडा मंजूर केलेला असतानाही पुन्हा नवीन आराखड्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावरून महापालिका आणि पर्यावरण प्रेमी नागरिक यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *