डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : प्रभाग क्रमांक ०३ मध्ये भाजपच्या उच्चशिक्षित उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांच्या प्रचार सभा व पदयात्रांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेल्या महिला नेतृत्वावर महिलांनी दाखवलेला हा विश्वास प्रभागातील राजकीय वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे.
( Strong Womens Support Boosts BJP Candidate Aishwarya Pathare’s Campaign)
प्रचाराच्या प्रत्येक सभा आणि पदयात्रेत महिलांची उपस्थिती सातत्याने वाढत असून, महिला मतदारांनी एकत्र येत उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. “आमच्या प्रश्नांसाठी आमचाच प्रतिनिधी हवा” अशी ठाम भावना महिलांमध्ये व्यक्त होत असून, त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण प्रचाराला नवे बळ मिळत आहे.
‘सखी प्रेरणा मंच’ – महिलांनी महिलांसाठी उभारलेले व्यासपीठ
या पार्श्वभूमीवर महिलांनी महिलांसाठी सुरू केलेले ‘सखी प्रेरणा मंच’ हे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या मंचाला आतापर्यंत १० हजारांहून अधिक महिलांचा पाठिंबा लाभला आहे.
हा मंच महिलांच्या आनंद, शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर एकत्रितपणे मते मांडण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून महिलांना केवळ प्रतिनिधित्वच नव्हे, तर सामाजिक व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाची संधीही मिळत आहे. प्रभाग क्रमांक ०३ मध्ये महिलांचा हा वाढता सहभाग आणि संघटित आवाज आगामी विकासाची दिशा ठरवणारा ठरत असल्याचे चित्र आहे.
