डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदननगर येथील भाजी मार्केट येथे मंगळवारी (ता. ६) भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
( Will achieve the resolution of victory BJPs public resolution meeting in Chandannagar)
प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) व प्रभाग क्रमांक ०४ (खराडी-वाघोली) मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.
प्रभाग क्रमांक ०३ मधून ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव, रामदास दत्तात्रय दाभाडे, तर प्रभाग क्रमांक ०४ मधून सुरेंद्र बापूसाहेब पठारे, शैलजीत जयवंत बनसोडे, रत्नमाला संदीप सातव, तृप्ती संतोष भरणे हे उमेदवार उपस्थित होते.
सोबतच, भाजपा महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, जिल्हाध्यक्ष: भाजपा पुणे (उत्तर) प्रदीप कंद तसेच स्थानिक माजी नगरसेवक व नागरिक बांधव उपस्थित होते.
सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संकल्प सभेत दोन्ही प्रभागांच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट दिशा मांडण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, सुरक्षा अशा मूलभूत नागरी सुविधांसह भविष्यातील नियोजन, दीर्घकालीन विकास आणि नागरिकांच्या अपेक्षांवर आधारित विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भाजपाच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध, पारदर्शक आणि लोकाभिमुख विकास साधण्याचा ठाम संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. “नागरिकांच्या सहकार्याने दोन्ही प्रभागांचा विकास अधिक वेगाने साध्य होईल”, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
